देवळाली गाव भागातील प्रभाग क्रमांक 22 मध्ये विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.वारंवार मनपा अधिकाऱ्यांना तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नसल्याने या संदर्भात स्थानिक नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने नाशिकरोड मनपा विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांना पुन्हा निवेदन देण्यात आले आहे. शौचालय ड्रेनेज पाईपलाईन दूषित पाणी रस्त्यांच्या मधोमध पडलेली मोठमोठे खड्डे या विषयांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले.