हिंगणघाट शहरातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर मिरवणुकींच्या विसर्जन मार्गांवर अनेक वर्षांपासून विद्युत तारा अडथळा ठरत होते. रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतर हे तारा थेट विसर्जन मार्गाला लागत असल्यामुळे वेळोवेळी नागरिकांना काठीच्या सहाय्याने किंवा इतर उपाय करून मार्ग मोकळा करावा लागत होता. या धोकादायक परिस्थितीमुळे अपघात व जीवितहानीची शक्यता कायम होती.या गंभीर समस्येची दखल घेऊन आमदार कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता.