वर्धा जिल्ह्यातील देवळी-पुलगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट कोसळले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर "चारकोल रॉट" (मुळकुज व खोडकुज) या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या रोगामुळे पिके पिवळी पडून शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत आणि प्रत्यक्ष उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट होत आहे. याशिवाय काही भागांमध्ये "पिव