आज शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी सातारा पोलिसांनी माहिती दिली की, 11 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी अशोक लक्ष्मण डुकरे वय 61 वर्ष राहणार टीव्ही सेंटर छत्रपती संभाजी नगर यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 4 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता आरोपी शपीक खान रफिक खान राहणार पानचक्की छत्रपती संभाजी नगर याने फिर्यादीला मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम बळजबरीने चोरी करून नेली आहे, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक भंडारे पुढील तपास करीत आहे.