आठवडी बाजार येथे वरली मटका नावाचा जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा पथक बुलढाणा च्या पथकाने छापा टाकून एका इसमास २६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेदरम्यान पकडले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोका मनोज खरडे यांनी त्यांच्या पथकासह आठवडी बाजारात छापा टाकून आकाश रामा कासुर्डे, वय 30 वर्ष रा रेल्वे कॉलनी यास पकडले व त्याच्या ताब्यातून जुगार साहित्य वरली मटका अंकल चिट्टी पेन नगदी असा ऐकून २५४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.