आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता सिंभोरा येथील अपर वर्धा धरणाचे तेरा ही दरवाजे उघडले असल्याने, दुपारी तीन वाजता पासून, चांदूरबाजार, वरुड व विविध ठिकाणावरून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी धरण परिसरात वाढली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या असून, पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आला आहे