पनवेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याचे सत्र सुरूच असून वावंजे येथे एका ज्येष्ठ नागरिकाला फसवण्यात आले आहे. वावंजा गावात राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीला त्रिकुटाने फसवले. बोलण्यात गुंतवून पोलीस असल्याचे भासवत सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अडीच लाख रुपयांचे दागिने फसवणुकीची तक्रार नोंदविण्यात आली आहे.