सोलापुरात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पडलेल्या पावसामुळे सोलापुरात प्रचंड गोंधळ उडाला आहे. सकल भागात पाणी साचले असून अनेक रस्त्यांवर सध्या गुडघ्यापेक्षा जास्त पाणी असल्याचे पाहायला मिळते. सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अक्कलकोट महामार्गावर गुडघ्यावर पाणी आले असून त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.