छत्रपती संभाजी नगर ते नांदेड महामार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील येळी फाटा येथे सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी लागू केलेल्या हैदराबाद गॅझेटियरचा जीआर शासन निर्णय रद्द करावा, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात गठीत केलेली समिती रद्द करावी,मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण आता व भविष्यात देण्यात येऊ नये या मागणीसाठी दिनांक ५ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११ते दुपारी १ वाजे दरम्यान तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करून हैदराबाद गॅझेट जीआर ची होळी केली.