तुमसर तालुक्यातील माडगी येथे वैनगंगा नदीपात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह दि. 27 ऑगस्ट बुधवारला सकाळी 11 वा.च्या सुमारास आढळला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकाच्या मृतदेहाला पाण्याबाहेर काढत मृतदेह शवविच्छेदनाकरिता शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे दाखल केले. दरम्यान पोलीस पंचनामा व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून घटनेचा मर्ग तुमसर पोलिसात दाखल करण्यात आला असून सदर अनोळखी इसम कोण व कुठला याचा शोध तुमसर पोलीस करीत आहेत.