शाहूपुरी येथील रेणुका हाऊसिंग सोसायटी आझाद नगर बस स्टॉप जवळ ज्ञानदेव चंद्रकांत जगदाळे वय 49 वर्षे हे 31 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता फॅब्रिकेशन चे दुकान उघडण्यासाठी जात असताना एका मोटरसायकल वरून दोन अज्ञात व्यक्तीने त्यांचा पाठलाग करून त्यांची मोटरसायकल अडवली व काही समजण्याच्या आतच मोटरसायकलच्या मागील बसलेल्या व्यक्तीने लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर मारण्यास सुरुवात केली या त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली त्यामुळे ते खाली पडले यावेळी मोटर सायकल चालत याने देखील मारहाण केली.