करूळ घाट शनिवार १३ सप्टेंबर पासून वाहतूकीस सुरू होणार आहे. घाटातील धोकादायक दरडी हटविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तृप्ती घोड्मिसे यांनी आज शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता वाहतूक सुरु करणेबाबतचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्यामुळे गेले नऊ दिवस बंद असलेली तरेळे - कोल्हापूर मार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्ववत होणार आहे. वाहन चालक व प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.