सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड यांचा हा खटला संथ गतीने चालत नाही. योग्य पद्धतीने सुरू आहे असे मत वाल्मीक कराडचे वकील अॅड. खाडे यांनी न्यायालय परिसरात माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारी पक्षाला त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते तसे करत आहेत. त्याचप्रमाणे आरोपी पक्षालाही स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही तो कायदेशीर पद्धतीने करीत आहोत. ते पुढे म्हणाले की, कुठल्याही प्रकारची दिरंगाई नसल्याचे खाडे यांनी स्पष्ट केले.