पंचवटी गोदावरी नदी पात्रात एका पुरुष जातीचे नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.अज्ञात व्यक्ती किंवा महिलेने एक दिवसाच्या पुरुष जातीच्या बाळाला गोदावरी नदी पात्रात फेकून तेथून पळ काढला आहे.सदर बालक स्थानीक रहिवाशांना मृत अवस्थेत नदीपात्रात आढळून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.अद्याप या प्रकरणी अधिक माहिती मिळालेली नसून पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.