कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे.कर्जमाफी मागतो म्हणजे भीक मागत नाही.उद्योपतींची १६ लाख कोटींची कर्जमाफी केले.सरकारने शेतीमालाच्या भावात आजपर्यंत लुटलंय, त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्ज झाले.उद्योगपतींचं १६ लाख कोटींचं कर्ज केंद्र सरकार माफ करतं, मग आमचाही उद्योग तुमच्या धोरणामुळे तोट्यात गेलाय त्यामुळे आम्हाला सरसकट कर्जमुक्त केलंच पाहिजे, तो आमचा अधिकार असे मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे.