माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे अनेक लोकांच्या घरामध्ये गांजा असल्याची माहिती पोलिसांना देत अनेक ठिकाणी गांजा ठेवून त्याचबरोबर काहींच्या घरांवर हरणाची कातडी ठेवून तक्रारी दाखल करण्यात आल्या. पुढे ते लोक निर्दोष सुटले आहेत, या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ढवळे यांनी केली आहे. आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी एक वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.