तुमसर तालुक्यात गत आठ दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यातच आज दि. 13 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी दोन वा.च्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात गीता एकनाथ मंगलकर रा. चुल्हाड, ता. तुमसर यांच्या घराची मातीची भिंत कोसळल्याने मातीच्या ढिगार्यात जीवनावश्यक वस्तू दाबले गेल्याने मोठे नुकसान झाले. यावेळी संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसानग्रस्त घरमालकाला आर्थिक मदत जाहीर करावी व त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा. अशी मागणी ग्रा.पं. सदस्य परमभूषण शामकुवर यांनी केली आहे.