धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी जिंतूर तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी आज बुधवार 1 ऑक्टोबर रोजी जोरदार रस्ता रोको आंदोलन केले. परभणी-जिंतूर महामार्गावर तीन तास वाहतूक ठप्प ठेवत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. समाजाच्या मागण्यांकडे शासनाने वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला.