भरदार ट्रक थेट घराच्या कंपाऊंडमध्ये शिरल्याची घटना देवळाली कॅम्प भगूर रोडवरील बन्ना चाळ येथे घडली असून मोठी जीवित हानी टळली आहे.सदर घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.राखेचा ट्रक चालकाचे ट्रकवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे.ट्रकने दिलेल्या धडकेत घराच्या कंपाउंडची सुरक्षा भिंत तुटली असून अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.