अकोल्यात आज एक धक्कादायक घटना घडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे यांचा 21 वर्षीय मुलगा यश पातोडे याच्यावर शुक्रवारी दुपारी खदान पोलीस स्टेशन हद्दीत चाकूने सात वार करण्यात आले. दरम्यान 31 वर्षीय आरोपी सुरज इंगोले याने घरात घुसून हल्ला केला. यशची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपीच्या ओमनी कारला आग लावली तसेच घरावरही हल्ला केला या गोंधळात सुरज इंगोले जखमी झाला.