शिक्षण आणि डिग्री ही व्यक्तीच्या ओळखीची शान आहे, हे अधोरेखित करण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गिरणार चौक येथे ‘मेरी डिग्री, मेरा अभिमान’ या अनोख्या आंदोलनाचे आयोजन आज दि 29 आगस्ट 4 वाजता करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या डिग्री हातात घेऊन घोषणाबाजी करत शिक्षणाचा सन्मान करण्याचा संदेश दिला.