राज्य शासनाकडून विविध विकास कामांची ८९ हजार कोटींची देयके थकीत असून, शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या अकोला शाखेने केली आहे. ४ जुलै रोजी दुपारी ५ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ओपन कंत्राटदार, बेरोजगार अभियंते, मजूर संस्था यांच्या अडचणी मांडण्यात आल्या. ५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होऊनही कंत्राटदारांचे पैसे न मिळाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.