गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी गावात शुक्रवारी घडलेल्या एका दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. गावातील ५३ वर्षीय शेतमजूर बिभिषण सुदाम लोंढे यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बिभिषण लोंढे हे गावाचे माजी सरपंच यांच्या कडे महिना गडी म्हणून काम करत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे गावातील पाझर तलावावर आपले बैल धुण्यासाठी गेले होते. मात्र, तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल भागात गेले आणि बुडून मृत्यू पावले.