ऑपरेशन यु टर्न तसेच जड वाहतूक रोखण्यासाठी नागपूर शहरात ठीक ठिकाणी नो एन्ट्री पॉईंट लावण्यात आले आहे. या अंतर्गत आज दिनांक 11 सप्टेंबरला रात्री सात वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार एक भले मोठे कंटेनर पोलिसांनी इशारा दिला असताना सुद्धा नो एन्ट्री पॉईंट मधून सुसाट वेगाने पळाले. दरम्यान वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून वडधामना परिसरात त्या कंटेनर ला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे या कंटेनर ची नंबर प्लेट देखील झाकलेली होती. पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये 70 गोवंश आढळले.