सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी प्रक्रियेत पारदर्शकता व सोईसाठी महापालिकेकडून ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात पोलीस, मनपा प्रशासन आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित राहून एकाच छताखाली परवानगी देत आहेत. 18 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या उपक्रमास मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत तब्बल 351 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परवानगी प्रक्रियेत लागणारा वेळ