लाखनी तालुक्यातील सिपेवाडा येथे काही आरोपी हे अवैधरित्या जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून लाखनी पोलिसांनी दिनांक 23 ऑगस्ट रोजी धाड टाकून कारवाई केली असता आरोपी खुशाल भोयर वय 45, वीरेंद्र कहालकर वय 40 दोन्ही रा. सिपेवाडा व केशवराव देशमुख वय 47 रा. केसलवाडा वाघ या आरोपींच्या ताब्यातून 52 तास पत्ते व नगदी 3 हजार 560 रुपये असा एकूण किंमत 3600 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी सदर आरोपींवर पोलीस स्टेशन लाखनी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.