श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो,गणेशाची कृपेने ठाणे मनपाची कीर्ती कायम वृद्धींगत व्हावी अशी प्रार्थना ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. ठाणे मनपा कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे पूजन आयुक्त सौरभ रावांनी त्यांच्या पत्नी प्रियंका राव यांनी केले. मनपा कर्मचारी गणेश उत्सव मंडळाचे यंदाचे हे 43 वर्ष असून यावेळी आयुक्तांनी ठाणेकरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त,उपायुक्त तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.