गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला चाळीसगावातील एकदंत महोत्सव २०२५ मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात नुकताच संपन्न झाला. आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाला यंदाही नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या दहा दिवसांच्या कालावधीत ५० हजारांहून अधिक नागरिकांनी महोत्सवाला भेट देऊन विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. हा महोत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, तो चाळीसगावातील सामाजिक आणि सांस्कृतिक एकोप्याचे प्रतीक बनला आहे.