अपारा लॉजिस्टिक सोलुशन कंपनीमध्ये ट्रकचालक असलेले जितेंद्र बधाई हे दिनांक 30 ऑगस्टला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कन्हान येथून ट्रक लोडिंग करून येत असताना हैदराबाद जबलपूर हायवे रोडवर त्यांच्यासमोर चालणाऱ्या अज्ञात ट्रक ने अचानक ब्रेक दाबले दरम्यान जितेंद्र यांनी सुद्धा अचानक ट्रकचे ब्रेक दाबल्याने त्यांच्या ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात जितेंद्र गंभीर जखमी झाले त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला.