कासारवडवली परिसराच्या विहंग व्हॅली येथे अडीच फूट खड्ड्यात दोन मृतदेह तरंगताना आढळले. माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाल्यानंतर कासारवडवली पोलीस,अग्निशमन दल, आपत्ती प्रतिसाद घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही मृतदेह बाहेर काढून कारवाईसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. यामध्ये 35 वर्षीय महिला आणि तीन वर्षाच्या मुलाचा समावेश असून त्यांची ओळख पटलेली नाही. तसेच ते दोन्ही मृतदेह तेथे कसे आले याबाबत देखील अद्यापपर्यंत कोणतीही माहिती मिळू शकली नसून प्रकरणाचा पुढील तपास कासारवडवली पोलीस करत आहेत.