एका ३२ वर्षीय इसमाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना शेगाव तालुक्यातील जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोक्ता येथे १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. याबद्दल पोलीस स्टेशन येथे तक्रारीवरून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, शेगाव तालुक्यातील जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोक्ता येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातीलच एका ३२ वर्ष इसमाने पळून नेले.