कोल्हापूर येथील अंबाबाई तसेच जोतिबा मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणचे आधुनिकीकरण करत असताना देवस्थानच्या मूळ ढाच्याला धक्का लागणार नाही याची संबंधित एजन्सीने दक्षता घ्यावी, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात देवस्थान (तिर्थक्षेत्र) विकास आराखड्याच्या अनुषंगाने विविध विकास विषयक कामांंबाबत आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्या बोलत होत्या.