गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी जलजीरा खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना आज घडली. दुपारी शाळेत जेवण केल्यानंतर पाचव्या वर्गाच्या मुलींनी शाळेलगत असलेल्या दुकानातून जलजीरा घेतला व तो पिण्याच्या पाण्यात टाकून पिल्यानंतर त्यांना मळमळ, उलटी आणि पोटात दुखण्याचा त्रास झाला. एकाच वर्गातील सात विद्यार्थिनींना एकासोबत पोटात दुखू लागल्याने मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनींना विचारणा केली असता जलजीरा खाल्याची माहिती विद्यार्थिनी दिली.