बापरे! मालेगावी लाखो रुपयांच्या चायना मालाची होळी न्यू सरस्वती स्टील फर्निचर दुकानासमोरच घटना Anc: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन द्यावे आणि चायनीज वस्तूंना बहिष्कार करावा असे आवाहन केल्यानंतर मालेगावात व्यावसायिकांनी चायना मालाची होळी केली. या होळीत लाखो रुपयांच्या चायना वस्तू जाळण्यात आल्या. विनोद कुचोरिया या व्यावसायिकाने आपल्या दुकानातून काल दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान चायनीज वस्तू बाहेर काढून त्यांची होळी केली.