पाथरडी नगरपालिकेच्या नव्या इमारतीला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव द्यावं या मागणीसाठी पाथरडी शहरात मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत.आमचा अंत पाहू नका आठ दिवसात नामकरण न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने नाव देऊ असा इशारा किसन आव्हाड यांनी नाईक चौकामध्ये धरणे आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला.पालिकेच्या नव्या इमारतीला मुंडे यांचं नाव देण्याची सुरुवातीला प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती मात्र नंतर नव्या पदाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव ठेवू असं सांगत मुद्दा पुढे ढकलला या निर्णयामुळे कार्यकर्त्य