शहरातील सर्व नळ धारकांनी आपल्या नळांना तात्काळ मीटर बसवणे बंधनकारक असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या मीटर नसलेल्या नळ धारकांकडून दरमहा 300 रुपये आकारले जात आहेत. तर मीटरधारकांना 10 युनिटपर्यंत किमान 120 रुपये आणि त्यापुढे प्रति युनिट 12 रुपये दराने बिल आकारले जाते. नागरिकांनी नळांना मीटर बसवून त्याची नोंद पाणीपुरवठा विभागात करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.