तडवळे स. वाघोली गावच्या हद्दीत लघुशंकेला व जेवणाला थांबलेल्या करमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात असणारा आरोपीने पोलिसाच्या हाताला हिसका देऊन पलायन केले. अचानक घडलेले या प्रकारामध्ये पोलिस अधिकाऱ्यालाच आरोपीच्या प्रतिकाराचा सामना करावा लागला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता मिळालेल्या माहितीनुसार,दि. 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास करमाळा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चंद्रसेन शिंदे हे जेवणासाठी थांबले असताना प्रकार घडला.