गणेशोत्सव काळात मिरवणुकांमध्ये अनेकदा प्रकाश यंत्रणा ( लेझर लाईट) वापरली जाते. या लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लाईट मिरवणुकांमध्ये वापरू नये असे अकोला पोलिसांनी सांगितले आहे. अकोला शहरात आज मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. लाडक्या बाप्पाला आज अकोलेकरांकडून निरोप दिला जात आहे. या दरम्यान शहरात मिरवणुक काढण्यात आली आहे. अनेकदा मिरवणुकीत झगमगाट करण्यासाठी विविध प्रकारच्या लेझर लाईटचा वापर केला जात असल्याचे प्रकार दिसून येत आहे.