महाराष्ट्रातील महसूल सेवक (कोतवाल) पदास चौथ्या श्रेणीचा दर्जा व शासकीय सेवकांप्रमाणे सर्व सुविधा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाने वारंवार आश्वासने देऊनही अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्यामुळे महसूल सेवक संतप्त झाले आहेत. विदर्भ महसूल सेवक संघटना तालुका शाखा, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने १२ सप्टेंबर २०२५ पासून महसूल मंत्री यांच्या कार्यक्षेत्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा आज ११ सप्टेंबर गुरुवार रोजी. प्रसार माध्यमांशी बोलताना करण्यात आली आहे.