महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी घरी जाऊन चोप दिला. केदार सोमण असे या युवकाचे नाव असून त्याच्यावर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. पुण्यातल्या वनाज परिसरात हा प्रकार घडला आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या हवाली केले.