महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी वर्षा मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची बदली झाल्याने ही नियुक्ती करण्यात आली असून, मात्र त्यांच्या बदलीचे ठिकाण अद्याप स्पष्ट झालेले नाही.वर्षा मीना यांनी 2018 मध्ये UPSC द्वारे भारतीय प्रशासकीय सेवेतील यश संपादन केले.महाराष्ट्र कॅडर मिळाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला नाशिक येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते.