कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायत हद्दीतील साळोखवाडी येथे विजेच्या धक्क्याने दोन जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. रामचंद्र गोतीराम वाघमारे हे घराजवळील शेवग्याच्या झाडावर शेंगा काढण्यासाठी चढले होते. त्या झाडाच्या बाजूने महावितरणच्या विजेच्या तारा होत्या. मुसळधार पावसामुळे या तारा खाली लोंबकळत होत्या, याची वाघमारे यांना कल्पना नव्हती.शेंगा काढताना वाघमारे यांना विजेचा जोरदार धक्का बसला. झाडाखालील पत्नी पार्वती यांनाही धक्का लागला.