बोरगाव येथे शामरावबापू कापगते स्मृति प्रतिष्ठान साकोली, प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी,सत्यसाई संस्थान भंडारा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बोरगाव यांच्या संयुक्तवतीने शनिवार दि.30ऑगस्टला सकाळी11ते सायंकाळी सहा या वेळात आयोजित भव्य आरोग्य शिबिरात100पेक्षाही अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.साकोली विधानसभा क्षेत्राचे मा.आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी रुग्णांची तपासणी केली.डॉ.रश्मी वैद्य तसेच वाय व्ही अहिर,आर सी बोरकर यांनीही आरोग्यसेवा दिली.सरपंच उषाताई डोंगरवार यांनी शिबिराचे उद्घाटन केले