रत्नागिरी : रामचंद्र फाउंडेशन गुजरात,स्वयंपूर्तता फाउंडेशन रत्नागिरी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ॲनिमिया नियंत्रणासाठी दि.20 मे 2025 रोजी पंचायत समिती देवरुख (संगमेश्वर) येथे ॲनिमिया नियंत्रण प्रकल्पाचे उद्घाटन मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांचे शुभहस्ते झाले. याप्रसंगी मा.गटविकास अधिकारी भरत चौगले,सहा. गटविकास अधिकारी शिंदे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद मोरे, स्वयंपूर्तता फांडेशन सचिव युयूत्सु आर्ते व त्यांची टिम तसेच तालुक्यातील वैदयकीय अधिकारी,सी.एच.ओ.,आरोग्य कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने सर्व महिला,पुरुष कर्मचाऱ्यांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली.