१५ ऑगस्ट रोजी मुंब्रा परिसरातील एका व्यक्तीने घरामध्ये 35 तोळे सोन्याची चोरी झाल्याची तक्रार मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये दिली होती दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला मात्र दरवाजाचा टाळा, कडीकोंडा किंवा खिडकी काहीही न तोडता ही चोरी झाली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी जवळच्या व्यक्तीने चोरी केल्याचा अंदाज वर्तवल्यानंतर तपास सुरू केला असता येथे राहणाऱ्या संबंधित व्यक्तीच्या नातेवाईक महिलेने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. महिलेला तळोजा इथून मुद्देमाला सह अटक केली.