आज गुरुवारी दुपारी दिग्रस शहरासह परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे धावंडा नदीला अचानक पूर आला. आज दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान आलेल्या या पुरामुळे आर्णी पुलावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. पुलाजवळ परिस्थिती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दिग्रस पोलिसांच्या वतीने नदीच्या दोन्ही काठी बंदोबस्त लावण्यात आले होते. मोतीनगर तसेच मलिकार्जुन मंदिर परिसरातील काही घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे.