राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी संघटनेच्या माध्यमातून सतत पाठपुरावा सुरु आहे.परंतु,प्रत्याक्षात मागण्या मान्य होत नसल्याने आणि घेतलेल्या निर्णयाची आंमलबजावणी होत नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकीकरण समिती व एकता संघाने आंदोलन सुरु केले आहे.परंतु,त्याकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याने या आंदोलनाचा 13 वा दिवस आहे.आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी बुधवार दि.2 सप्टेंबर 25 रोजी दु.2 वा. दिली.