शिवाजी नगर परिसरात राहणारी २१ वर्षीय तरुणी कुमकुम आनंदा शिंदे ही घरातून अभ्यासासाठी वाचनालयात जात असल्याचे सांगून सोमवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तिचा कोणताही थांगपत्ता लागत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी मंगळवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.