लातूर–काल दुपारी एक वाजता शहरातील बार्शी रोडवरील मुख्य मार्गावर जिल्हा परिशेदेच्यासमोर काही वेळेसाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या वाहनालादेखील ट्रॅफिकमध्ये थांबावे लागले. या प्रसंगानंतर पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आज दि. 4 सप्टेंबर रोजी तातडीने सकाळी 11 वाजल्यापासून होमगार्ड कर्मचाऱ्यांची अतिरिक्त ड्युटी लावण्यात आली.