गणेश उत्सवाला लवकरच सुरुवात होणार असून या उत्सवात गणेश मूर्तीसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा उपयोग केला जातो तर सजावटीसाठी थर्माकोलचा उपयोग केला जातो यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते तसेच पर्यावरणाला हानी पोहोचते. असे होऊ नये यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सदर उपक्रम राष्ट्रीय हरित सेनेच्या सहकार्याने हाती घेतला.